‘पीएमपी’चे नव्याने वेळापत्रक आखणार - मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - शहर आणि उपनगरांमधील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) मार्गांचे सुसूत्रीकरण करून बसगाड्यांचे नव्याने वेळापत्रक आखण्याचे नियोजन करण्यात येईल. ज्यामुळे वर्दळीच्या मार्गांवर पुरेशा बसगाड्या सोडणे शक्‍य होईल; तसेच बस थांब्यांवर आवश्‍यक त्या सुविधा उभारण्यात येतील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी सांगितले. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात पीएमपी सेवा सुधारण्याच्या उद्देशाने महापौर टिळक यांनी कात्रज ते स्वारगेटपर्यंत ‘पीएमपी’तून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘पीएमपी’ सक्षम करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची ग्वाही त्यांनी प्रवाशांना दिली होती. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमक्‍या उपाययोजना आणि त्या अमलात आणण्यासाठीचा कालावधी याबाबत चर्चा केली. 

 टिळक म्हणाल्या, ‘‘नियोजित वेळेत प्रवाशांना बसगाड्या मिळत नसल्याने त्यांना थांब्यांवर ताटकळत राहावे लागते. त्यात, महिला प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे वर्दळीच्या मार्गांवर वेळेत आणि पुरेशा बस उपलब्ध करण्याचे नियोजन आहे; तसेच बसथांब्यांची दुरुस्ती प्राधान्याने केली जाईल. प्रत्येक थांब्यावर आसन व्यवस्था करण्यात येणार असून, बसमध्ये महिलांसाठी राखीव जागांवर त्यांनाच प्राधान्य देण्याबाबत सूचना केल्या आहेत; तसेच प्रमुख बसथांब्यांच्या परिसरात अनेक ठिकाणी खासगी वाहने आणि बेकायदा हातगाड्या, स्टॉल उभारण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे सर्व ठिकाणांची पाहणी करून अतिक्रमणे काढण्यात येतील.’’

Web Title: new timetable for PMP bus