‘निगडी-देहूरोड’ चौपदरीकरणास गती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

देहूरोड - रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या निगडी ते देहूरोड चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. एक डिसेंबर २०१६ रोजी काम सुरू झाले आहे. गेल्या चार महिन्यांत चौपदरीकरणासह मार्गातील उड्डाण पुलाच्या प्राथमिक स्तरावरील विविध पातळ्यांवरील कामे अंतिम टप्प्यात आहेत.

देहूरोड - रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या निगडी ते देहूरोड चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. एक डिसेंबर २०१६ रोजी काम सुरू झाले आहे. गेल्या चार महिन्यांत चौपदरीकरणासह मार्गातील उड्डाण पुलाच्या प्राथमिक स्तरावरील विविध पातळ्यांवरील कामे अंतिम टप्प्यात आहेत.

महामंडळांतर्गत चौपदरीकरणाचे काम पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर, तर उड्डाणपुलाचे काम टी ॲन्ड टी इन्फ्रा प्रा. लि. पुणेमार्फत सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चौपदरीकरण कामातील दोन्ही बाजूंच्या सीमाभिंतीचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. भिंतीच्या आतील बाजूस रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी (फिल्टर मीडिया) दगडी भरावाचे काम सुरू आहे. दोन किलोमीटरपर्यंतचे खडीकरण पूर्ण झाले आहे. मार्गात केंद्रीय विद्यालय, लष्कराच्या सीक्‍यूएएसव्ही आणि दारुगोळा निर्मिती कारखान्याजवळ भूमिगत पादचारी पुलांचा समावेश असून, हा प्रस्ताव लष्करी कार्यालय दप्तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. रुंदीकरणात येणाऱ्या कॅन्टोन्मेंट तसेच एमईएसच्या नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूंच्या भिंतीलगत जमिनीवरील गटाराचे काम सुरू आहे. दरम्यान, मार्गातील झाडे तोडण्याचा मुद्दा सध्या 

न्यायप्रविष्ठ असल्याने झाडांच्या ठिकाणचे काम स्थगित ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

मार्गात गुरुद्वारा ते रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूदरम्यान १.०२५ किलोमीटरच्या उड्डाणपुलाचा समावेश असून, या अनुषंगाने प्राथमिक स्तरांवरील १० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे टी ॲन्ड टी इन्फ्रा प्रा. लि. च्या सूत्रांनी सांगितले. यात सेवा रस्त्यावरील नित्याच्या सांडपाणी वाहिन्या, तसेच पावसाळी वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी ६०० एमएम आरआरसी मधील दोन फुटांचे सिमेंट पाइप वापरले आहेत. रेल्वे उड्डाण पूल ते बॅंक ऑफ इंडिया चौक उतारावरील भरावाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असून, उजव्या बाजूच्या भरावाच्या भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

मार्गात सध्याच्या रेल्वेवरील जुन्या पुलास समांतर पुलाच्या कामाचा समावेश असून, या पुलाचे एमएसआरडीच्या वतीने बनविलेले डिझाईन मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनास पाठविले आहे. त्यास अजून मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. १.०२५ किलोमीटरच्या उड्डाण पुलाचे डिझाईन तयार असून, ते तपासणीसाठी सरकारच्या पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सादर केले आहे. त्यास हिरवा कंदील मिळाल्यावर पुढील आठ दिवसांत पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. 

चौपदरीकरण कामाच्या निविदेतील अटी आणि शर्तीनुसार सहा महिन्यांत १५ टक्के काम व्हायला पाहिजे. मात्र, कामाची चांगल्यापैकी सुरू असलेली गती पाहता सहा महिन्यांत काम १५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त काम होईल.

- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

Web Title: Nigdi-dehu road road work progess