पुणे - शिर्सुफळच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना महापुरुषांचा विसर

संतोष आटोळे 
शनिवार, 14 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह अकरा सदस्यांना महापुरुषांचा विसर पडल्याचे दिसत आहे. आज (ता.14) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उपसरपंच अनुसया आटोळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन साजरी करण्यात आले. यावेळी 13 सदस्यांपैकी उपसरपंच यांच्यासह फक्त तीनच सदस्यच उपस्थित होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या या कृती बद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येथील ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपसरपंच अनुसया आटोळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायती सदस्य अँड.नितीन आटोळे, छाया कुंभार, माजी सदस्य अजित शिंदे, माजी उपसरपंच बाळासाहेब म्हेत्रे, बारिकराव म्हेत्रे, तानाजी आटोळे, विजय हिवरकर, राजेंद्र गुरव इ.मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी सरपंच अतुल हिवरकर यांच्यासह उर्वरित दहा सदस्य कार्यक्रमाला अनुपस्थित होते.याबद्दल उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामसेवक दत्तात्रय धावडे, ग्रामपंचायती कर्मचारी अरुण शिंदे, संजय हिवरकर यांनी केले. या गैरहजेरीबाबत सरपंच हिवरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

Web Title: officers forget about babasaheb ambedkar birth anniversary in shirsufal grampanchayat