ज्येष्ठांच्या वसाहतीची संकल्पना ही काळाची गरज - सुनील गावसकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - '‘ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास वसाहत स्थापन करणे ही काळाचीही गरज बनलेली आहे. परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्‍शन) लि.ने याच संकल्पनेतून ‘अथश्री’ या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गृहसंकल्पनेला सुरवात केलेली आहे आणि यापुढे तिचा व्यापक प्रमाणात विस्तारही होत आहे, ही चांगली गोष्ट आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी येथे केले.

पुणे - '‘ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास वसाहत स्थापन करणे ही काळाचीही गरज बनलेली आहे. परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्‍शन) लि.ने याच संकल्पनेतून ‘अथश्री’ या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गृहसंकल्पनेला सुरवात केलेली आहे आणि यापुढे तिचा व्यापक प्रमाणात विस्तारही होत आहे, ही चांगली गोष्ट आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी येथे केले.

पुणे शहर आणि राज्यभरात अनेक ठिकाणी ‘अथश्री’चे प्रकल्प उभारल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिली परिपूर्ण टाउनशिप उभारली जाणार आहे. पुण्याजवळील भूगाव येथे ‘फॉरेस्ट ट्रेल्स’ प्रकल्पातील ३५ एकर जागेत ‘अथश्री व्हॅली’ ही सर्व सोयींनी परिपूर्ण अशी टाउनशिप उभारण्यात येणार आहे. गावसकर हे ‘अथश्री’चे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ असणार आहेत. त्याच्या घोषणेप्रसंगी गावसकर बोलत होते. या वेळी परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, अध्यक्ष श्रीकांत परांजपे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश खटावकर आदी उपस्थित होते.
‘अथश्री’ प्रकल्पात चित्रीकरण करून परतलेले गावसकर या संकल्पनेने भारावून गेले होते. ते म्हणाले, ‘‘अथश्री’तील वातावरण पाहून मला माझ्या घरची आठवण झाली. आज माझी आई ९१ वर्षांची आहे. तिच्या २४ तास शुश्रुषेची व्यवस्था करण्याची माझी क्षमता आहे; पण बऱ्याच जणांना ते शक्‍य होतेच असे नाही. अनेकांची मुले परगावी किंवा परदेशात असतात. अशा वेळी वयस्कर आई-वडिलांकडे पाहण्याची व्यवस्था करणे कठीण होते; परंतु ‘अथश्री’त ज्येष्ठांना आवश्‍यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा मिळत असल्याने तेथे खूप छान वातावरण आहे आणि ज्येष्ठ नागरिक समवयस्क मंडळींबरोबर हसतखेळत राहात असल्याचे मला जाणवले.’’  

नजीकच्या काळात नाशिक, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, गुडगाव, चेन्नई, इंदूर व मुंबई; तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील हेवर्ड या शहरात ‘अथश्री’ गृहप्रकल्प साकारण्यात येणार आहे, असेही श्री. परांजपे यांनी या वेळी सांगितले. याबरोबरच येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन्स या ठिकाणी ‘सीनिअर लिव्हिंग एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे

पुणे - तळपायामध्ये होणारी वेदना असह्य होत असल्यामुळे एक मुलगी आईला जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात घेऊन...

05.03 AM

पुणे - शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये डेंगीसह जापनीज मेंदूज्वर आणि हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे...

04.48 AM

पुणे -  असे जगावे दुनियेमध्ये,  आव्हानाचे लावून अत्तर...  नजर रोखुनी नजरेमध्ये,  आयुष्याला द्यावे उत्तर...

03.48 AM