ख्रिसमसनिमित्त ऑनलाइन शॉपिंगची धूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पुणे - ॲनिमेटेड लॅंप, म्युझिकल सांता, गोल्ड ख्रिसमस ट्री, कलरफुल ग्रीटिंगकार्ड आणि स्पेशल ख्रिसमस चॉकलेट बॉक्‍स... अशा वैविध्यपूर्ण भेटवस्तू ख्रिसमसच्या निमित्ताने ऑनलाइन ऑर्डर केल्या जात आहेत. ख्रिसमसनिमित्त विविध संकेतस्थळावर गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध असून, यंदा पहिल्यांदाच लाल रंगांच्या थीमनुसार ख्रिसमससाठी खास ‘गिफ्ट हॅंपर’ तयार केले आहे. वेगवेगळी फुले, चॉकलेट्‌स, की-चेन्स आणि ग्रीटिंग कार्ड असलेले अनोखे गिफ्ट हॅंपर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ख्रिसमसला ऑनलाइन गिफ्ट ऑर्डर करणाऱ्यांना २० ते ३० टक्के सवलत मिळत असल्याने खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

लहानग्यांना गिफ्ट देता यावे म्हणून चॉकलेट्‌स, केक, खेळणी, कलरबुक अशा विविध वस्तू पाहता येतील. तर ख्रिसमससाठी खास कलरफुल आकाशदिवे, एलईडी बलून्स, सांताक्‍लॉज टॉय विथ लाइट, चॉकलेट विथ रोझ बॉक्‍स, मोबाईल स्टॅंड, कलरफुल लॅंप, की-चेन्स, फोटो-फ्रेम्स, वॉल हॅंगिंग आणि इलेक्‍ट्रॉनिक गिफ्ट्‌स खरेदी केले जात आहेत. १८ फ्लेवर्स असलेल्या चॉकलेट्‌सचा बॉक्‍स आणि गिटार वाजविणारा सांताक्‍लॉज लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हॅंडमेड पर्स, घड्याळ, मेकअप किट, नेकलेस, टी-शर्टस अशा विविध वस्तू गिफ्ट देण्यासाठी ऑर्डर केल्या जात आहे. कॅंडल्स, ख्रिसमस ट्री आणि सांताक्‍लॉजचे कपडे अशा विविध वस्तूही भेट देण्यासाठी खरेदी करण्यात येत आहे. नोटाबंदीमुळे दहा दिवसांपूर्वीच काहींनी गिफ्ट ऑनलाइन ऑर्डर केले आहेत.

याबाबत जॉन लोकनादन म्हणाला, ‘‘वेगवेगळ्या संकेतस्थळावर गिफ्टच्या वैविध्यपूर्ण व्हरायटी उपलब्ध असल्याने मी गिफ्ट ऑनलाइन ऑर्डर केले. मी दरवर्षी ख्रिसमसला कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देतो. भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो.’’ 

गुडी बॅगही ऑनलाइन
सांताक्‍लॉजची गुडी बॅग... गिफ्टने भरलेली... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी अन्‌ ख्रिसमसच्या निमित्ताला खास बनवणारी... हीच वेगवेगळ्या गिफ्टने भरलेली ‘गुडी बॅग’ आता ऑनलाइनही ऑर्डर केले जात आहे. चॉकलेट्‌स, कॅंडीज, टॉइज, किचेन्स आणि ग्रीटिंग कार्ड अशा वैविध्यपूर्ण भेटवस्तूंनी भरलेली सांताक्‍लॉजची ही ‘गुडी बॅग’ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 

पुणे

पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल आणि याचे पुरावे असतील तर, खरं काय ते लोकांसमोर यायला...

04.24 PM

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री...

04.00 PM

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या...

03.21 PM