कॅमेऱ्याऐवजी मिळाल्या साबणाच्या वड्या (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मंचर येथे ऑनलाइन शॉपिंगद्वारे 25 हजारांची फसवणूक

मंचर (पुणे) : ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर सावधान...कारण ऑनलाइन शॉपिंगचा मोह मंचर (ता. आंबेगाव) येथील एका दाम्पत्याला महागात पडला. आशा धनंजय थोरात व धनंजय सुधाकर थोरात यांनी ऑनलाइन शॉपिंग करताना आकर्षक ऑफरला बळी पडले. ऍमेझॉन शॉपिंग कंपनीद्वारे 24 हजार 990 रुपये किमतीचा कॅमेरा ऑनलाइन बुक केला. मंचरला आलेले कुरिअर उघडून पाहून त्यांना धक्काच बसला. त्यामध्ये तीन साबणाच्या वड्या होत्या.

काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग करताना amazon.in या साईट वर DS 1300D या कॅनॉन कंपनीच्या कॅमेऱ्याची बाजारात किंमत तीस हजार रुपये आहे. ऑनलाइनने खरेदी केल्यास कॅमेरा कमी किमतीत मिळतो, असे ऍमेझॉनवर आढळले. त्यानुसार बुधवारी (ता. 4) बुकिंग केले. शनिवारी (ता. 7) इ कॉम एक्‍सप्रेस या कुरिअर कंपनीद्वारे मंचरच्या कार्यालयात कुरिअर आल्याचा मोबाईल आला. त्यानुसार थोरात दाम्पत्य कार्यालयात गेले. बॉक्‍स ताब्यात घेण्यापूर्वी कुरिअर कंपनीकडे रक्कम जमा केली. घरी गेल्यानंतर बॉक्‍स उघडले. कॅमेऱ्याऐवजी तीन साबण, कॅमेरा ठेवण्यासाठीची मोकळी पिशवी, कॅनॉन कंपनीचे बुकलेट होते. बॉक्‍स खालच्या बाजूने उघडून त्याला चिकट टेप लावला होता. थोरात दापत्यांने कुरिअर कार्यालयात तेथील कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनतर मंचर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. ऍमेझॉन व इ कॉम कंपनीला (कुरिअर) मेलद्वारे फसवणूक झाल्याचे कळविले आहे. या प्रकरणी पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजीव कांबळे व नवनाथ नाईकडे करीत आहेत.

Web Title: online shopping frauds in manchar