पक्षांनी खुल्या मनाने पराभव मान्य करावा - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पुणे - 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर इतर सर्वच पक्षांकडून भारतीय जनता पक्षाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, निवडणुकीनंतर अशा शंका उपस्थित करण्यास काहीच अर्थ राहत नाही. विरोधी पक्षांनी खुल्या मनाने स्वतःचा पराभव मान्य केला पाहिजे,’’ असे मत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत (ईव्हीएम) विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केले. 

अभिजित कदम मेमोरिअल फाउंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर राणे पत्रकारांनी बोलत होते. ते म्हणाले,‘‘भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे जिंकला नसला तरीही, निवडणुकीतील पराभवासाठी काहीही कारणे देऊ नयेत. याबाबत आधीपासूनच काळजी घेणे आवश्‍यक होते. मात्र, ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याच्या चर्चेत काहीच तथ्य वाटत नाही.’’ 

राज्य सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचे सूतोवाच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहेत. त्या बाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना राणे म्हणाले,‘‘ शिवसेना सत्तेत असेपर्यंत अविश्‍वास ठराव मांडणे अशक्‍य आहे. त्यामुळे आता काय करावे आणि काय नाही, हे शिवसेनेने ठरवायचे आहे. मात्र, माझ्या मते सत्तेचा मोह झालेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर घालवल्याशिवाय ती बाहेर पडणार नाही.’’

Web Title: The parties agreed to open your heart beating