प्रवाशांशी संवाद म्हणजे स्टंटबाजी नव्हे - महापौर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - पीएमपीमध्ये संचालक असताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणाने काम केले आहे. बसमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधणे म्हणजे स्टंटबाजी आहे, असे कोणाला वाटत असेल तर ते अपरिपक्वतेचे लक्षण आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. 

पुणे - पीएमपीमध्ये संचालक असताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणाने काम केले आहे. बसमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधणे म्हणजे स्टंटबाजी आहे, असे कोणाला वाटत असेल तर ते अपरिपक्वतेचे लक्षण आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. 

महापौरांनी वानवडी- महापालिका दरम्यान नुकताच बस प्रवास केला. त्या वेळी महिलांच्या आरक्षित सीटवर बसल्याबद्दल भाजप, शिवसेनेच्या सदस्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी आंदोलन केले. त्याबाबत स्पष्टीकरण देताना महापौर म्हणाले, ""पीएमपीमध्ये सुमारे 12 वर्षे संचालक असताना जबाबदारीने काम केले आहे. पीएमपीच्या ताफ्यामध्ये बसची संख्या वाढावी, यासाठी 1550 बस घेण्यासाठी राजकीय सहमती घडवून तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीबद्दल माझी भूमिका काय आहे, हे सर्वश्रृत आहे. बसमधून प्रवास करताना सर्व नागरिकांशी संवाद साधत होतो. त्या वेळी बसमध्ये अनेक सीट मोकळी होती. तेव्हा एका आजीबाईंनी त्यांच्याशेजारी बसण्याची विनंती केली म्हणून मी तेथे बसलो. महिलांना उभे करून त्यांच्या आरक्षित जागेवर बसलेलो नाही. त्याचे पुरावे फेसबुकवर माझ्या अकाउंटवर टाकले आहेत.'' राजकारण करून पुणेकरांची दिशाभूल करण्यासाठी भाजपकडून मला लक्ष्य केले जात आहे, असेही महापौरांनी म्हटले आहे. 

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

08.09 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’...

04.00 PM

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM