पवना धरण शंभर टक्‍के भरले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पवनानगर - पवना धरण रविवारी (ता. 13) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस चांगला झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यानंतर धरणातून पाणी सोडले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले होते.

Web Title: Pavananagar Pavana Dam