कचरा, वाहतुकीकडे लक्ष द्या - बापट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

पुणे - पाणीपुरवठा योजनेपाठोपाठ कचरा आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची सूचनाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समितीच्या अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना सूचना केल्याचे सांगण्यात आले.  

दोन- तीन दिवसांत निर्णय
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांच्या निविदा प्रकियेचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे. निविदा प्रकियेत कोणताही गोंधळ झालेला नाही, त्यामुळे या कामांना दिलेली स्थगिती मागे घेतली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या संदर्भात राज्य सरकारबरोबर चर्चा करण्यात येत असून येत्या दोन- तीन दिवसांत सकारात्मक निर्णय होईल, असेही सांगण्यात आले आहे.  

सरकारकडील थकबाकीबाबत चर्चा
केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची एकत्रित बैठक झाली. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, त्यांची अंमलबजावणी, त्याचा कालावधी व परिणामाबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडील थकबाकीबाबत या वेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.