पेट्रोल पंप रविवारीही सुरू राहणार!

यशपाल सोनकांबळे
शनिवार, 13 मे 2017

पुणे : 'सर्वसामान्य नागरिकांना त्रास न देण्यासाठी पेेट्रोलपंप सुरू ठेवा अन्यथा 'मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करु', असा इशारा दिल्यानंतर रविवारी पेट्रोलपंप बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या विविध मागण्यांवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

या बैठकीतील निर्णयावर पालकमंत्री बापट म्हणाले, ''राज्यातील पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांवर पुन्हा बैठक होणार आहे. रविवारी पंप बंद ठेवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाल्यास 'मेस्मा' कायद्याची अंमलबजावणी करू, असा इशारा दिल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज्य पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.''

यावर पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी म्हणाले, ''केंद्र सरकारच्या महागाई निर्देंशांकाच्या प्रमाणात पेट्रोलचे प्रक्रिया दर ठरवा, अशी आमची मागणी होती. येत्या 17 मे रोजी मुंबईमध्ये राज्य सरकारबरोबर यासंदर्भात बैठक होणार आहे. त्यात या मागणीवरील निर्णय होणार असल्याने रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे.''

केंद्र सरकारच्या अपूर्वा चंद्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मुंबईत 17 मे रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.