पेट्रोल पंपांवर गुरुवारीही पोलिस बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - पेट्रोल भरण्यासाठी गुरुवारीही शहर व उपनगरांतील पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, "शंभर रुपयांच्या नोटा संपल्या आहेत. ग्राहकांना द्यायला सुटे पैसे नाहीत,' असे फलक लावून पंपचालकांमार्फत वाहनचालकांना सुटे पैसे द्या आणि पेट्रोल भरा, असेच सांगण्यात येत होते. बुधवारप्रमाणे गुरुवारीही काही पंपांवर ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले. पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. तरीही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आदल्यादिवशीप्रमाणे आजही पंपांवर पोलिस बंदोबस्त होता. 

पाचशे, हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर पेट्रोल पंपांवर लगेचच पाचशेच्या पटीत पेट्रोल भरा सुटे पैसे नाहीत, असे फलक लावण्यात आले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मात्र पंपांवरची वाहनचालकांची गर्दी मर्यादित होती. पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारण्यात येत होत्या. परंतु कोणी तीनशे तर कोणी सहाशे रुपयांचे पेट्रोलची मागणी करीत होते. त्यामुळे ग्राहकांना परत द्यायला सुटे पैसे नसल्याचे कारण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, बहुतांश नागरिकही सुटे पैसे देऊन पेट्रोल भरून घेत असल्याचेही चित्र शहरातील पेट्रोल पंपांवर पाहायला मिळाले. 

ग्राहक अमेय देसाई म्हणाले, ""बुधवारी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात वाहनचालकांच्या रांगा होत्या. त्या तुलनेत गुरुवारी पंपांवरील वाहनचालकांची संख्या मर्यादित होती. पेट्रोल भरून देण्याकरिता सुटे पैशांचीच मागणी वारंवार होत होती. सुटे पैसे संपले असेही पंपावरील कर्मचारी सांगत होते. त्यामुळे ग्राहकांना पाचशे, हजार रुपयांची नोट देऊन सुटे पैसे होईपर्यंत थांबावे लागत होते.''

पुणे

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या...

03.21 PM

पुणे : पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव,  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा...

01.33 PM

पुणे - जुन्नरजवळ आळेफाटा हद्दीत वडगाव आनंद येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतल्याने मोटारीतील तिघांचा होरपळून...

09.42 AM