ट्रीपलसीट दुचाकीवरील दोघांचा मोटारीच्या धडकेत मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

पिंपरी - चुकीच्या दिशेने ट्रीपलसीट जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव मोटारीची जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता. 4) रात्री साडेबाराच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर मोशीमध्ये घडली. 

योगेश मारुती कडवे (वय 27) आणि गोविंद देवराव शेळके (वय 22, दोघेही रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर संतोष अरुण डिडवळ (वय 23, रा. आदर्शनगर, मोशी) याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश, गोविंद व संतोष हे दुचाकीवर ट्रीपलसीट मोशीकडून पुण्याच्या दिशेला चुकीच्या बाजूने जात होते. त्यावेळी नाशिकच्या दिशेला भरधाव जाणाऱ्या मोटारीची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. घटनेनंतर मोटार चालक पळून गेला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही नागरिकांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र योगेश, गोविंद यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी योगेशचा मावस भाऊ आदिनाथ लेंडगुळे (वय 22) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मोटार चालकाविरोधात फिर्याद दिली.