आंद्रातून विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

टाकवे बुद्रुक - आंद्रा धरण परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे सांडव्यावरून 516 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच वाढला तर विसर्ग अजून वेगाने वाढू शकेल. रात्री परिसरात 47 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती शाखा अभियंता अनंता हांडे यांनी दिली. 

जलाशयाची पाणीपातळी 614 मीटर असून, एकूण पाणीसाठा 83.30 टक्के आहे. त्यापैकी उपयुक्त साठा 82.74 टक्के आहे. धरण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे. आतापर्यंत 1535 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आंद्रा नदी व इंद्रायणीच्या पाणीपात्रात वाढ झाली असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे ठोकळवाडी धरणाच्या परिसरातील धबधबे ओसंडून कोसळत असल्याने ठोकळवाडीच्या पात्रात वाढ झाली आहे. संततधार पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मासेमारी करणाऱ्या कातकरी, भोई समाज बांधवांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

धरण परिसरातील ओढे-नाल्यांचे पाणी वाढले आहे. भात खाचरांत पाणी तुंबले आहे. हा पाऊस भातपिकाला उपयुक्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Web Title: pimpri news andhra dam rain