सराईत गुन्हेगाराला तीन पिस्तुलांसह अटक 

सराईत गुन्हेगाराला तीन पिस्तुलांसह अटक 

पिंपरी - महाराष्ट्रासह भारतातील चार राज्यांच्या पोलिसांना हव्या असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके उपस्थित होते. 

प्रदीप बालगोविंद सिंग ऊर्फ परिहार (वय 27, रा. पिढोरा, ता. तहसील- बाह, जि. आग्रा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तपास पथकातील उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांना देहूफाटा येथे परिहार पिस्तूल घेऊन आल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असता त्याच्याकडे तीन पिस्तुले व 20 जिवंत काडतुसे आढळून आहे. पोलिस चौकशीत महाराष्ट्रातील एमआयडीसी भोसरी (पुणे), पारसुनी (नागपूर), एन. एम. जोशी मार्ग (मुंबई) आदी पोलिस ठाण्यात हत्यार कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशमधील पिढोरा (आग्रा) कोर्टचे त्याला फरारी घोषित केले होते. फिरोजाबादमध्ये त्याने बस वाहकावर गोळीबार करून रोकड लुटली होती. नोयडा सेक्‍टर नं.24 पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. राजस्थानमधील मनीया, राजखेडा व देवलीठाणा पोलिस ठाण्यात हत्यार कायदा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आंध्र प्रदेश राज्यात त्याने दोन पेट्रोल पंप लुटले आहेत. असे 21 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ही कारवाई अप्पर आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडीक, उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, हवालदार अजय भोसले, रवींद्र तिटकारे, नाईक किरण काटकर, मोहन जाधव, शिपाई नवनाथ पोटे, अमोल निकोट, करण विश्‍वासे, विशाल काळे, स्वप्नील लांडगे यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com