नववीच्या पुस्तकांचा शहरात तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पिंपरी - शहर परिसरातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बाजारपेठेत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप होत आहे. 

पिंपरी - शहर परिसरातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बाजारपेठेत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप होत आहे. 

चिंचवड स्टेशन येथील पंकज पुस्तकालयाचे सुरेश गादिया म्हणाले, ‘‘इंग्रजी माध्यमातील केवळ गणित (भाग-१)चे पुस्तक बाजारात आले आहे. उर्वरित गणित भाग-२, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा पाठ्यपुस्तके बाजारात फारशी उपलब्ध नाहीत. मराठी माध्यमामध्ये गणित भाग-१, भाग-२, विज्ञान, इतिहास-भूगोलांची पुस्तके आहेत. परंतु मराठी, हिंदी-इंग्रजी भाषा पाठ्यपुस्तकांचा तुटवडा आहे. येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.’’