बीआरटी १०० किलोमीटर

गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर - नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्गाचे चित्र.
गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर - नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्गाचे चित्र.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात येत्या सहा महिन्यांत बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) सेवा देशात सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारी होईल. या काळात होणाऱ्या ४५ किलोमीटर मार्गामुळे सुमारे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये बीआरटीचे ९७ किलोमीटरचे जाळे असून, पिंपरी-चिंचवडमध्ये हा विस्तार शंभर किलोमीटर करण्याचे नियोजन आहे.

देशात २००६ मध्ये शहरी वाहतूक धोरण जाहीर झाल्यानंतर पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी प्रकल्प कात्रज ते हडपसर या मार्गावर हाती घेण्यात आला; तर दिल्लीतही त्याचवेळी बीआरटी सुरू झाली. वर्षभरातच डिसेंबर २००७ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्येही बीआरटी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. आतापर्यंत यासाठी शहरात सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च झाले.

सांगवी-किवळे मार्गावर सप्टेंबर २०१५ मध्ये; तर नाशिक फाटा-वाकड मार्गावर नोव्हेंबर २०१५ मध्ये बीआरटी सुरू झाली. वर्षभरातच या दोन्ही मार्गांवरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या मार्गांवर दररोज एक लाख प्रवासी याचा लाभ घेतात. पुणे- मुंबई रस्त्यावरील निगडी-दापोडी मार्गावर येत्या जानेवारीत बीआरटी सुरू होणार असून, सध्या या मार्गावर रोज १ लाख ६८ हजार प्रवासी ये-जा करत आहेत. ही संख्या एक लाख ८० हजारांवर पोचेल, असा अंदाज आहे.

काळेवाडी-देहू आळंदी रस्ता हा बीआरटीचा चौथा मार्ग जून २०१८ मध्ये सुरू करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. या नवीन मार्गाचा फायदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना होणार असून, रोज सुमारे एक लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे हे चार मार्ग सुरू झाल्यानंतर शहरात किमान साडेतीन लाख प्रवासी बीआरटी सेवेचा वापर करतील. बीआरटी बससेवेसाठी देशात सर्वाधिक नावाजलेली अहमदाबाद येथील जनमार्ग ही बससेवा आहे. तेथे सध्या ८९ किलोमीटर रस्त्यावर असलेल्या या सेवेचे रोजचे सरासरी प्रवासी एक लाख ३५ हजार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर किलोमीटर रस्त्यावर बीआरटी झाल्यानंतर शहराच्या सर्वच भागांत ही बससेवा पोचेल. मेट्रो रेल्वे प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण झाल्यानंतर, पिंपरी- चिंचवड हे देशात सार्वजनिक वाहतूक सेवेचा सर्वांत प्रभावीपणे वापर करणारे प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल.

पुणे महापालिकेने किवळे-सांगवी मार्गाला जोडणाऱ्या औंध ते पुणे महापालिका भवन; तसेच निगडी-दापोडी मार्गाला जोडणाऱ्या दापोडी ते पुणे महापालिका भवन या बीआरटी सेवेसाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

शहरातील दहा मार्गांपैकी काही मार्गांवर हायब्रीड पद्धतीची बीआरटी असेल. म्हणजे कमी रुंदीच्या रस्त्यावर अन्य वाहनांना प्रवेश देण्यात येईल. सर्व मार्गावर बीआरटी सेवा सुरू झाल्यानंतर निगडी ते निगडी हा शहरांतर्गत वर्तुळाकार बीआरटी मार्ग सुरू करता येईल. भक्ती-शक्ती, निगडी, किवळे, रावेत, जगताप डेअरी, कासारवाडी, नाशिक फाटा, भोसरी, मोशीमार्गे परत निगडी या वर्तुळाकार मार्गावर बस धावल्यास शहरातील अनेक भागांतील नागरिकांची सोय होईल.

अहमदाबाद जनमार्ग (बीआरटी)
किलोमीटर   ९७
बसथांबे   १५७
बसमार्ग   १३
गाड्या   २५०
रोजचे प्रवासी   १,५०,०००
रोजचे उत्पन्न (रुपये)  १९,२४,६७८
बीआरटीचा प्रारंभ   १४ ऑक्‍टोबर २००९
स्रोत : मुकेशकुमार, अहमदाबाद महापालिका आयुक्तांचा अहवाल.
 
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग (ऑक्‍टोबर २०१७)
मार्ग   फेऱ्या   रोजचे प्रवासी   उत्पन्न (लाख रुपये)

सांगवी-किवळे   ११६   ७३,२९८   १०.७९
नाशिक फाटा-वाकड   १५   १०,५००   १.५४
येरवडा-वाघोली   १४५   १,०३,३९१   १४.९६
संगमवाडी-विश्रांतवाडी   ७३   ४५,३३८   ६.६७
(नियोजित मार्ग)
दापोडी-निगडी   २५८   १,६८,१४७   २४.४६

१) १०७४५ - गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर - नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्गाचे चित्र.
२) १०७४६ - मुकाई चौक, किवळे - औंध-किवळे बीआरटी मार्गावर असलेले सुसज्ज बस टर्मिनल.
३) १०७४७ - भोसरी बीआरटी बस टर्मिनल
४) १०७४८ - पिंपरी-चिंचवडमधील चारही मार्गांच्या बीआरटी मार्गाचा नकाशा.
५) १०७४९ - रेनबो लोगो 
६) १०७५० - जगताप डेअरी - नाशिक फाटा ते वाकड बीआरटी मार्गावरील बसथांबा.
७) १०७५१ - जगताप डेअरी बीआरटी बस स्थानक.
८) १०७५२ - जगताप डेअरी बीआरटी बस स्थानक.
९) १०७३३ - रावेत - औंध-किवळे बीआरटी मार्गावर धावणारी बस. 
१०) १०७३४ - रावेत - फक्त बीआरटी बससाठीची सूचना.
११) १०७३५ - मुकाई चौक, किवळे - औंध-किवळे बीआरटी मार्गावर असलेले बस टर्मिनल
१२) १०७३७ - मुकाई चौकातील बीआरटी बस टर्मिनलचा आतील भाग.
१३) १०७३८ - भोंडवे वस्ती, रावेत - बीआरटी बसथांब्यावर थांबलेली बस.

शहरातील चार मार्गांवर बीआरटी बससेवा सुरू झाल्यानंतर रोज सुमारे साडेतीन लाख प्रवाशांची वाहतूक आपण करू. बीआरटीचा वापर करणाऱ्या शहरांच्या तुलनेत प्रवाशांची ती संख्या सर्वाधिक असेल. 
- विजय भोजने, प्रवक्ते, बीआरटीएस विभाग, महापालिका

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन दोन बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी गाड्या, त्यांच्या खेपा यांचे नियोजन आम्ही पूर्ण केले आहे. अहमदाबादच्या जनमार्गची तुलना आपल्याशी होऊ शकत नाही. त्यांच्यापेक्षा आपल्याकडील प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गांना फीडर बससेवा म्हणून शहरांतर्गत काही नवीन मार्गावर जादा गाड्या सुरू करणार आहोत. 
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी चांगली व गुणवत्तापूर्ण बीआरटी बससेवा सुरू करीत आहोत. नाशिक फाटा येथून हिंजवडीला बीआरटी मार्गातून जाण्यासाठी वातानुकूलीत गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. देशात सर्वांत सक्षम बीआरटी आपल्या शहरात राबविण्यात येईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com