महाविद्यालयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पिंपरी - महाविद्यालयामध्ये जात असताना एका अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण केले. तसेच तिला लॉजवर नेऊन तिच्यावर दोघांनीही सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 28) सकाळी घडली. 

पिंपरी - महाविद्यालयामध्ये जात असताना एका अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण केले. तसेच तिला लॉजवर नेऊन तिच्यावर दोघांनीही सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 28) सकाळी घडली. 

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी महेश दत्तात्रेय बिडवे (वय 22) आणि किरण किशोर बागनाईक (वय 30, दोघेही रा. सांगवी) यांच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील महेश बिडवे या आरोपीला अटक केली असून किरण बागनाईक हा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी यांची एक वर्षभरापूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. गुरुवारी पीडित मुलगी महाविद्यालयात जात असताना आरोपी मोटारीमधून त्या ठिकाणी आले. तूला फिरवून आणतो, असे तीला म्हणाले, मात्र तिने नकार दिला. त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने मोटारीत बसवून शहरातील एका लॉजमध्ये नेऊन दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

याबाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मधुमती शिंदे करत आहेत.