खंडेनवमीनिमित्त कंपन्यांत यंत्रपूजन उत्साहात

भोसरी - औद्योगिक भागात खंडे नवमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
भोसरी - औद्योगिक भागात खंडे नवमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

पिंपरी - शहर परिसरातील असंख्य लघुउद्योग, मध्यम उद्योगांमधून खंडेनवमीनिमित्त उत्साहात यंत्रपूजन करण्यात आले. मोठ्या उद्योग-कंपन्यांमधून व्यवस्थापन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रित खंडेनवमी साजरी केली. काही ठिकाणी कामगारांनी पारंपरिक वेशभूषा करून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. कंपन्यांत मिठाईचे वाटपही करण्यात आले. 

टाटा मोटर्स कंपनीत जेआरडी टाटा आणि सुमंत मुळगावकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चिंचवड, के ब्लॉक आणि पिंपरी प्रकल्पामध्ये, खंडेनवमीनिमित्त व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यंत्रपूजन केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) सतीश बोरवणकर, प्रकल्प प्रमुख अलोक सिंग, क्वालिटी प्रमुख अनिल सिन्हा, मनुष्यबळ विकास विभागाचे सर्फराज मणियार, संचालक राजेश खत्री यांनी यंत्रपूजन केले. कामगार संघटनेकडून अध्यक्ष समीर धुमाळ, सरचिटणीस उत्तम चौधरी, कार्याध्यक्ष सतीश काकडे, माजी कार्याध्यक्ष सुरेश जामले यांनीही यंत्रपूजनात सहभाग घेतला. बोरवणकर यांनी कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबद्दल कामगारांना मार्गदर्शन केले. 

आकुर्डीतील बजाज ऑटो कंपनीच्या उपहारगृहात यंत्रसामग्रीचे प्रतिकात्मक सामूदायिक पूजन करण्यात आले. यानिमित्त कंपनीत कमानी उभारून फुलांची सजावट करण्यात आली. रांगोळीही काढण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास झांझरी, महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) महाराणा रे, महाव्यवस्थापक (क्वालिटी)  एन. एस. सराफ, उपमहाव्यवस्थापक एच. आर. गोखले, क्रीडा अधिकारी अनिल पगारे आदी अधिकारी-कामगार वर्ग उपस्थित होता. 

चिंचवडमधील एसकेएफ कंपनीतील प्रत्येक विभागात रांगोळ्या काढण्यात आल्या. दुपारी दीडच्या सुमारास यंत्रपूजन केले. कारखान्याचे व्यवस्थापक श्‍याम दात्ये, महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) जेकब वर्गीस, कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत लिंगायत, सरचिटणीस बाळा पणीकर, उपाध्यक्ष संजय तांडेल, सुभाष चव्हाण, सहसचिव डेव्हिड सोलोमनही उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या थरमॅक्‍स चौकातील मुख्य कार्यालयात खंडेनवमी साजरी केली. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष नितीन बनकर, संचालक प्रमोद राणे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यालयीन साहित्याचे पूजन करण्यात आले.

याखेरीज श्री इंजिनिअर्स, रागा कॉर्पोरेशन (भोसरी), विजया इंजिनिअरिंग, वत्सला एंटरप्रायजेस (कुदळवाडी), शीतल डाईज (पवना इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्‍स), एस. एस. इंजिनिअरिंग वर्क्‍स, साई ऑटो (पेठ.७), गौतमी इंजिनिअरिंग (तळवडे), लक्ष्मी इंजिनिअरिंग (चिंचवड) आदी लघुउद्योगांमधूनही खंडेनवमी उत्साहात साजरी झाली.  

पिंपरीतील थिसेनक्रूप इंडस्ट्रीजमध्ये कामगार, अधिकारी वर्गामार्फत, यंत्रपूजन आणि सामूदायिक पूजा करण्यात आली. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली. फुलांची सजावट केली. कंपनीचे कार्यकारी संचालक मलई दास, उपाध्यक्ष दारा दमानिया, माजी कार्यकारी संचालक ए. डी. कामदीन, तांत्रिक उत्पादन विभागाचे संचालक सुहास तलाठी, मनुष्यबळ विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र नागेशकर, कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कासारवाडीतील सिमंड्‌स मार्शलमध्ये कामगारांनी पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन केले. विविध विभागांत आकर्षक सजावट करण्यात आली. आवारात रांगोळी काढली होती. कामगारांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांना मिठाईचे वाटपही करण्यात आले. कामगार संघाचे महासचिव लक्ष्मीकांत भोर, उपाध्यक्ष आशुतोष शिंदे, खजिनदार सुहास माने, सहसचिव सचिन जाधव आदी याप्रसंगी उपस्थित होते. चिंचवडमधील डी-२ ब्लॉकमधील आनंद इंजिनिअरिंगमध्ये संचालक आनंद कदम, अमोल जगधने, सुधीर सकपाळ आदींनी यंत्रपूजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com