महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून, एकाला पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पिंपरी - निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला हवालदारच्या मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी - निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला हवालदारच्या मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

आदित्य सुनील जैंढ (वय २०, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य हा चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. सोमवारी दुपारी त्याला व त्याचा मित्र यांना तीन ते चार जणांनी एका मोटारीत जबरदस्तीने उचलून नेले. त्याला मोटारीतच मारहाण करण्यास सुरवात केली. पहिले दोन ते तीन तास मोटार शहरातच फिरत होती. तोपर्यंत त्याच्या काही मित्रांनी त्याच्या घरच्यांना याबाबत कळवले. त्याच्या चुलत्यांनी मारहाण करणाऱ्यांना फोन करून त्याला घरी आणून सोडण्याचे सांगितले. मात्र, मारेकऱ्यांनी त्याला व त्याच्या मित्राला सायंकाळी सहाच्या सुमारास मोशी येथील येथील एका खासगी रुग्णालयात सोडून ते पसार झाले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांना समजले असता त्यांनी रुग्णालयात धाव घेतली; परंतु घटना पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एका संशयिताला ताब्यात घेतले होते.