पिंपरी शहराचा निकाल ९३.३७ टक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

यंदाही मुलींचीच बाजी; शंभर टक्‍क्‍यांत ६५ शाळांचा समावेश
पिंपरी - बहुप्रतीक्षेत असलेला राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (ता. १३) जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ०.२४ टक्‍क्‍यांनी घटला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. 

पिंपरी-चिंचवड शहरातील १६२ खासगी शाळांपैकी ६५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यात महापालिकेच्या क्रिडाप्रबोधिनीचाही समावेश आहे. मागील वर्षी ५५ शाळांचा १०० टक्के निकाल लागला होता. चिंचवड मूकबधिर शाळेचा सलग तिसऱ्यांदा शंभर टक्के निकाल लागला. सर्वांत कमी देहूरोडमधील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचा ४७.०५ टक्के निकाल लागला. 

शहरातील सुमारे १८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी ३२ केंद्रातून परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये नऊ हजार ७९४ मुले व आठ हजार २६२ मुली परीक्षार्थी होते. यात नऊ हजार ३२ मुले (९२.३२ टक्के) आणि सात हजार ८२६ मुली (९४.७२टक्के) उत्तीर्ण झाल्याने मुलींचा टक्का वाढला. चिंचवडस्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेचा निकाल ७४.२८ टक्के लागला. प्रशालेतील ३५ पैकी २६ मुले पास झाली आहे.