वालचंदनगर - पिठेवाडीमध्ये फुटला ओढ्याला पाझर

राजकुमार थोरात
गुरुवार, 19 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठी असणाऱ्या पिठेवाडी गावामध्ये ऐन कडक उन्हाळ्यामध्ये ओढ्यामध्ये चार ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. येथे सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन आेढ्याचे खोलीकरण सुरु आहे. 

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठी असणाऱ्या पिठेवाडी गावामध्ये ऐन कडक उन्हाळ्यामध्ये ओढ्यामध्ये चार ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. येथे सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन आेढ्याचे खोलीकरण सुरु आहे. 

इंदापूर तालुक्यामध्ये नीरा नदीच्या काठावर पिठेवाडी गाव वसलेले आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तसेच प्रत्येक वर्षी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. गावालगत ओढ्याचे मोठे पात्र आहे. मात्र गाळ, झाडे, झुडपामुळे ओढ्याचे पात्रच नष्ठ होण्याच्या मार्गावरती होते. पावसाळ्यामध्ये पडणारे पावासाचे पाणी गावामध्ये न मुरताच वाहुन जात होते. पाणीटंचाईवरती मात करण्यासाठी गावाने सकाळ रिलीफ फंडातुन ओढा खोलीकरण करण्याची मागणी केल्यानंतर गावामध्ये सकाळ रिलिफ फंडातुन आेढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणास सुरवात झाली. ओढ्याचे काम करीत असताना चार ते पाच ठिकाणी पाण्याचे पाझर लागले आहेत. ऐन कडक उन्हाळतही दहा फुटावर पाणी लागल्यामुळे गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यासंदर्भात सरपंच नंदादेवी विजयसिंह बंडगर यांनी सांगितले की, सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे गावचा चेहरा मोहरा बदलणार असून पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मोलाची मदत होणार असल्याचे सांगितले.

अोढयावर बंधारे बांधणार - सागर सवासे 

ओढयाचे खोलीकरण व रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू अाहे.ओढ्याचे पात्र रुंद व खोल झाले असून पावसाळ्यामध्ये वाहुन जाणारे पाणी अडविण्यासाठी ओढ्यामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन दगडांचे बंधारे बांधून जास्तीजास्त पाणी अडविणार असल्याचे ग्रामसेवक सागर सवासे यांनी सांगितले. 

Web Title: pithewadi walchandnagar produce water in water storage odha