प्लॅस्टिकमुक्तीसाठी उद्या ‘ग्रीन रन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - नागरिकांमध्ये धावण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ’ आणि पुणे रनिंगतर्फे २७ मे रोजी ‘लॅस्कॉम ग्रीन रन’ आयोजित केली आहे. ‘स्वच्छ पाषाण-हरित पाषाण’ या संकल्पनेवर आधारित ही ग्रीन रन असेल. सूस रस्त्यावरील आदिशक्ती योगा सभागृह येथून धावण्यास सुरवात होईल. अधिक माहितीसाठी www.lscom.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. 

आत्तापर्यंत दोन हजार नागरिकांनी ग्रीन रनमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये पाच वर्षांपासून ते ७५ वर्षांपर्यंत वयाचे आबालवृद्ध सहभागी होणार आहेत. २१ आणि १५ किमीसाठी पहाटे साडेपाच वाजता, दहा किमीसाठी सकाळी सहा वाजता, पाच किमीसाठी सकाळी साडेसहा वाजता आणि तीन किमीसाठी सकाळी पावणेसात वाजताच्या कार्यक्रमात प्लॅस्टिक व कचरामुक्त पाषाणचा संकल्प करण्यात आला आहे. ‘ॲडव्हेंचर बियाँड बॅरिअर’ या संस्थेचे दृष्टिहीन धावपटूही यात सहभागी होणार आहेत. धावण्याच्या स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पहिल्यांदाच मतदार नोंदणी कार्यक्रम होणार आहे. आयुर्वेदग्राम आणि एमएमआय शाळा प्रायोजक आहेत. साईश्री रुग्णालयाची वैद्यकीय सेवा असेल. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल

Web Title: plastic free green run