प्लास्टिक मुक्त पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न

dindi
dindi

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळा व शिशुमंदीराच्या वतीने प्लास्टिकमुक्त पर्यावरण दिंडी उत्साहात संपन्न झाली. दिंडी सुरूवातीस प्रथम संत ज्ञानेश्वर, संत महाराज तुकाराम प्रतिमेचे व ज्ञानेश्वरीचे पूजन मुख्याध्यापक सौ. कल्पना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

बालचंमुनी श्री विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांचा वेश परिधान करून शाळेपासून गजानन महाराज मंदिरापर्यंत विठ्ठल नामाच्या गजरात हातात भगव्या पताका घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा, स्त्रीभ्रूण हत्या रोखा असे संदेशपर फलक हातात धरून दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित संदेश असलेल्या कागदी टोप्या डोक्यावर परिधान केल्या होत्या. तसेच दिंडी मार्गावर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कापडी पिशव्याचे नागरिकांना व दुकानदारांना वाटप करण्यात आले. दिंडी सोहळ्यात स्थानिक दुर्गामाता महिला भजनी मंडळाने सहभागी होत अभंगांचे गायन  केले. 

या दिंडी सोहळ्याचे संयोजन संतोष नवले, अरुण सोनवणे, सुरेखा भोसले, शोभा वाघमारे लता सावळे, विजया जाधव, ज्योती फापाळे, सविता देशमुख, शोभा उढाणे, मनिषा सोनवणे, कविता चित्ते, मृदूला कोटकर, पल्लवी राजगुरू, अश्र्विनी हाडवळे, सारिका आंद्रे, शारदा तरडे यांनी केले. विद्यार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com