#PMPlssue बीआरटीवरील वाहतुकीस तीन महिन्यांची प्रतीक्षा

PMP-Issue
PMP-Issue

पुणे - सातारा रस्त्यावरील बीआरटीची रडकथा आणखी दोन-तीन महिने तरी तशीच राहण्याची चिन्हे आहेत. हा प्रकल्प आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असला, तर पीएमपीकडे त्यासाठी अनुकूल बस उपलब्ध नाहीत. नवीन बस जानेवारीपर्यंत येतील आणि त्यानंतर या मार्गावर बीआरटीची वाहतूक सुरू होणार आहे. दरम्यानच्या काळात प्रवाशांची रडकथा कायम राहणार आहे. 

सातारा रस्त्यावर कात्रज- स्वारगेट दरम्यान बस रॅपिड ट्रान्सिट (बीआरटी) पहिला पथदर्शी प्रकल्प सुमारे १८ वर्षांपूर्वी सुरू झाला; परंतु त्यानंतर या रस्त्यावर स्वारगेट, प्रेमनगर चौक आणि धनकवडीमध्ये उड्डाण पूल साकारला. त्यामुळे या रस्त्याची सुमारे दोन वर्षांपूर्वी पुनर्रचना करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपये महापालिकेने खर्च केले आहेत. या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ते लवकरच होईल, असे पीएमपीच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी म्हटले आहे. मात्र, आता पीएमपीकडे या प्रकल्पाला अनुकूल असलेल्या बस उपलब्ध नाहीत. 

नव्या बसची प्रतीक्षा
पीएमपीमध्ये ४०० सीएनजीवरील बस विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तसेच, आणखी ४०० सीएनजीवरील बस भाडेतत्त्वावर घेण्याचे ठरले आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या बस जानेवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात येतील. त्यामुळे तत्पूर्वी सातारा रस्त्यावर बीआरटीची सेवा सुरू करता येणार नाही, असे पीएमपी प्रशासनाने महापालिकेकडे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील बीआरटीची वाहतूक आणखी तीन महिने तरी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीकडे सध्या बस उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असूनही पीएमपीला वाहतूक सुरू करण्यावर मर्यादा आहेत. नव्या बस आल्यावरच पीएमपीला या मार्गावरून वाहतूक सुरू करता येईल. 
- दिलीप माने, प्रमुख, वाहतूक विभाग, पीएमपी

कधी रस्त्याचे काम सुरू आहे, तर कधी बस नाहीत, हे कसले प्रशासकीय नियोजन? याबाबत लोकप्रतिनिधीही आवाज उठवत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. प्रशासकीय गोंधळाचा फटका प्रवाशांना दररोज बसत आहे. ही कसली स्मार्ट सिटी? 
- संकेत थिटमे, प्रवासी

बीआरटी मार्गाचे काम सुरू करताना ते पूर्ण केव्हा होणार हे निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता आली असती. यापुढील काळात नव्या बस उपलब्ध करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करायला हवी. 
- प्रांजली देशपांडे-आगाशे, अभ्यासिका, सार्वजनिक वाहतूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com