पोलिस वसाहतींचे प्रश्‍न सोडविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - ‘‘पोलिस वसाहतींच्या छोट्या-छोट्या समस्या महापालिका सोडवेल. मात्र देखभाल-दुरुस्ती व अन्य मोठी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे आवश्‍यक असूनही ती होत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संयुक्त बैठक लवकरच घेऊन पोलिस वसाहतींचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल,’’ अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी पोलिस वसाहतीमधील नागरिकांना दिली. 

महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत स्वारगेट पोलिस वसाहतीमधील पाण्याच्या टाकीच्या जागेची पाहणी महापौर टिळक यांनी केली. त्यानंतर ‘सकाळ’ने पोलिस वसाहतींची दुरवस्था व पोलिसांच्या प्रश्‍नासंदर्भातील वृत्तमालिकेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस कुटुंबीयांशी संवाद साधला. या वेळी पोलिस कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. 

टिळक म्हणाल्या, ‘‘पोलिस वसाहतीतील इमारती, सांडपाणी वाहिन्या, जलवाहिन्या खराब होण्याबरोबरच कमालीची अस्वच्छता असते. बाहेरील व्यक्ती पोलिस वसाहतींमध्ये सर्रास वाहने पार्किंग करून जातात. येथील छोट्या समस्या सोडविण्याचे काम महापालिका करत असते. परंतु मोठी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने केली पाहिजेत.’’

या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाला समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

जागेची पाहणी
महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये महापालिकेतर्फे पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्याची जुनी टाकी पाडून एक नवीन टाकी बांधली जाणार आहे. या टाकीच्या जागेची पाहणी टिळक यांनी केली. 

Web Title: police colony issue mukta tilak