तळेगाव: पोलिस हवालदाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

तळेगाव पोलिस ठाण्यामधील सेवेनंतर लांबकाने हे गेल्या सुमारे दोन वर्षापासुन देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. लांबकाने यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे

तळेगाव - महाराष्ट्र पोलिस दलामधील हवालदार संजय लक्ष्मण लांबकाने (वय 40, सध्या रा. तळेगाव ) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे आज (बुधवार) निष्पन्न झाले आहे.

लांबकाने यांच्या घराचा दरवाजा दोन दिवसांपासून बंद होता. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. देहूरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले लांबकाने हे सध्या रजेवर होते.

तळेगाव पोलिस ठाण्यामधील सेवेनंतर लांबकाने हे गेल्या सुमारे दोन वर्षापासुन देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. लांबकाने यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.