अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला पोलिस कोठडी 

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याला पोलिस कोठडी 

पुणे - दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपी गणेश शालिक निकम (वय २२, मूळ जळगाव, सध्या- मुळशी) याला सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी मंगळवारपर्यंत (ता. २५) पोलिस कोठडी सुनावली; तर या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप असणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालगृहात पाठविले . 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलींना निर्जनस्थळी नेऊन आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. यापैकी एका पीडितेचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या दोघींपैकी एका मुलीच्या आईने याबाबत हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पॉक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी एका मंदिराच्या आवारात या मुली या खेळत असताना तेथे राहत असलेल्या आरोपींनी पीडित मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंदिरामागील जंगलात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, एका मुलीला त्रास होत असल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com