गरिबांच्या दिवाळीत ‘गोडी’ नाहीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना फक्त १६० ग्रॅम जास्त साखर

पुणे - गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी पुरवठा विभागाने प्रतिमाणशी अवघी १६० ग्रॅम जादा या प्रमाणानुसार १४८७ क्विंटल साखर उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. तर पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत साखरेच्या कोट्यात एक क्विंटलची घट केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना फक्त १६० ग्रॅम जास्त साखर

पुणे - गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी पुरवठा विभागाने प्रतिमाणशी अवघी १६० ग्रॅम जादा या प्रमाणानुसार १४८७ क्विंटल साखर उपलब्ध करून देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे. तर पामतेलाचा अद्याप पत्ताच नाही. विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत साखरेच्या कोट्यात एक क्विंटलची घट केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

शहरात अंत्योदय योजनेखाली ११ हजार ७७२ लाभार्थी असून, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांची संख्या ३० हजार ५९७ आहे. अशा सुमारे ४२ हजारांहून अधिक कुटुंबांना पुरवठा विभागाकडून रेशन दुकानामार्फत दिवाळीसाठी साखर, पामतेल, डाळ पुरविली जाते. दरमहा प्रति माणशी ५०० ग्रॅम साखर साडेतेरा रुपये किलो या दराने वितरित करण्यात येते. या महिन्यात दिवाळी असल्याने साखरेच्या प्रमाणात माणशी १६० ग्रॅम वाढ करून हे प्रमाण ६६० ग्रॅम एवढे करण्यात आल्याची माहिती शहर पुरवठा अधिकारी शहाजी पवार यांनी दिली. 

सरकारच्या प्रमाणानुसार एका घरात सरासरी चार व्यक्ती गृहीत धरल्यास दिवाळीसाठी एका कुटुंबाला नेहमीपेक्षा केवळ अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त साखर सवलतीच्या दरात मिळणार आहे. गेल्या महिन्यात (सप्टेंबर) शहरासाठी १४८८ क्विंटल साखरेचा कोटा मंजूर झाला होता. या महिन्यात दिवाळी असल्याने त्यापेक्षा जास्त साखर उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. परंतु पुरवठा विभागाने गेल्या महिन्यापेक्षा एक क्विंटल कमी साखर उपलब्ध करून देऊन गरिबांविषयी अनास्था दाखवून दिली आहे. तुटपुंजी साखर उपलब्ध करून दिल्याने गरिबांनी दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पामतेल आणि डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. याबाबत पवार यांना विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. केवळ या महिन्यासाठी साखरेचा कोटा उपलब्ध करून दिला असून, तो शिवाजीनगर येथील धान्य गोदामात आल्याचे त्यांनी सांगितले.

दात कोरून पोट भरणे ही म्हण ऐकली आहे, परंतु सरकार आणि प्रशासन यांच्या या निर्णयाने दात कोरून सण साजरा करा, अशी नवी म्हण उदयाला आली आहे. गरिबाने अर्धा किलोमध्ये दिवाळीसारखा सर्वांत मोठा सण साजरा करावा, अशी सरकारची इच्छा दिसत आहे. राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट हे पुण्यातील असून, त्यांनी याबाबत योग्य निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 
- नितीन पवार (सामाजिक कार्यकर्ते)

पुणे

पुणे: "कष्टकरी व सरकारी कर्मचारी यांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी आत्तापर्यन्त प्रयत्नशील...

04.57 PM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अंतर्गत भागात पीएमपी बससेवा पुरेशा प्रमाणात नाही, असे आहे लोकप्रतिनिधींचे म्हणणे. त्यासाठी...

04.21 PM

खडकवासला - पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणात पाऊस पडत आहे. खडकवासला वगळता...

12.36 PM