आईला रांगेत उभे करणे, ही मोदींची जाहिरातबाजी! 

अमित गोळवलकर
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

अदानी समुहाला जागा देण्यासाठी रेल्वेच्या मालकीच्या जमिनी विकण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही जणांचा फायदा करून देण्यासाठीच मोदी यांनी 'डीडी किसान' ही वाहिनी सुरू केली.

पुणे : 'नोटाबंदीच्या निर्णयातून काही ठोस समोर येणार असेल, तर त्याचे स्वागतच करू. पण सध्या तरी 'कॅशलेस' अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच आहे,' असे मत कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज (गुरुवार) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 'स्वत:च्या जाहिरातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईलाही रांगेत उभे केले,' अशा शब्दांत शिंदे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. 

प्रणिती शिंदे म्हणाल्या, "गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले; तरीही महागाई सतत वाढलीच आहे. एकीकडे हे चित्र असताना मोदी यांनी स्वत:च्या जाहिरातीसाठी मात्र कोट्यवधी रुपये खर्च केले. नोटाबंदीच्या निर्णयातून ठोस काही निघणार आहे का? 'कॅशलेस' अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच आहे. जनता 'कॅशलेस' झाली आहे; पण यंत्रणा 'कॅशलेस' झालेली नाही. नोटाबंदीचा मोदी यांचा निर्णय पूर्णपणे फसला आहे.'' 

'उद्योगपती गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेत आहे,' असा आरोपही शिंदे यांनी केला. 'अदानी समुहाला जागा देण्यासाठी रेल्वेच्या मालकीच्या जमिनी विकण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही जणांचा फायदा करून देण्यासाठीच मोदी यांनी 'डीडी किसान' ही वाहिनी सुरू केली. त्यासंदर्भात काही बोलण्याचीही आम्हाला भीती वाटते. या देशात आता हुकूमशाहीच आली आहे. पंतप्रधान मोदींकडे संसदेत उत्तरे देण्याची हिंमत नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रांगेत उभे असताना झालेल्या मृत्युंना जबाबदार कोण? भाजपचे मित्रपक्षही नोटाबंदीच्या विरोधात आहेत. व्यापारीही या निर्णयाच्या विरोधात आहेत; पण कारवाईच्या भीती दाखविली जाते. 'या निर्णयाला नोटाबंदीचा पाठिंबा आहे,' खोटा प्रचार सोशल मीडियावरील भाजपचे पंटर करत आहेत,' असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

पुणे

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM

पुणे - राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात...

03.24 AM

शहरातील गणेश मंडळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणार आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवाने दशकानुसार...

02.48 AM