फडतरे उद्योग समूहाकडून वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा

provide medical service to warkari for phadtare
provide medical service to warkari for phadtare

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील फडतरे उद्योग समुहाच्या वतीने संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली.

संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज मंगळवारी (ता.17) कळंब मार्गे निरवांगीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. कळंबमध्ये फडतरे उद्येाग समुहाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करुन औषधांचे वाटप केले. तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जंक्शन मार्गे इंदापूरकडे रवाना झाला होता.

जंक्शन मध्ये फडतरे उद्योग समुहाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी, पायांची मसाज करणे, गोळ्या औषधाचे वाटप करण्यात आले. दोन्ही सोहळ्यामध्ये डॉ. पोपट कुंभार, डॉ. कमलाकर व्होरकाटे, डॉ. राजकुमार शहा, डॉ. नागनाथ जगताप, डॉ. एम.अे. हेगडे, डॉ. नितीन लोंढे, यांनी सहकार्य केले. वैद्यकीय सेवेचे नियोजन फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे, दत्तात्रेय फडतरे यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com