पुण्यात जातपंचायतीला कंटाळून एकाची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 29 ऑगस्ट 2016

पुणे - वडगावशेरी येथील अरुण किसन गायकू (वय 45) यांनी जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून सोमवारी मध्यरात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.. गेली दोन वर्षांपासून गायकू यांना जातपंचायतीच्या जातीच्या बाहेर काढले होते. त्यांनी पंचांना जातीत घेण्यासाठी वारंवार विनंती करीत होते. मात्र पंचांनी स्पष्ट नकार दिला त्यामुळे हाताश झालेल्या गायकू यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

गवळी समाजाच्या जातपंचायतीने गायकू कुटुंबास दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून जातीच्या बाहेर काढले होते. या संबंधी गायकू यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे पंचांनी गायकू यांना त्रास देण्यात सुरवात केली होती. त्यांना समाजाच्या कोणत्याच कार्यक्रमात बोलावयाचे नाही अशी तंबी त्यांनी दिली होती. गेली दोन वर्षांत कोणत्याच धार्मिक, उत्सवात, विवाह समारंभात त्यांना कोणी बोलावले नव्हते. त्यामुळे त्यांनी रविवारी पंचांची माफी मागून परत जातीत घ्या अशी विनंती केली. मात्र पंचांनी त्यांना अपमानीत करून पाठविले. 

पुणे

पुणे : युनिक आयडेंटिफिकेशन एथोरिटी ऑफ इंडिया (युडीएआय) कडून खासगी संस्थांकडून आधार कार्ड मधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी...

01.48 PM

पुणे - कात्रज परिसरात तरूणाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली....

01.45 PM

पुणे - बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच होती. "नो पार्किंग'मधील...

04.39 AM