पुणे : सीएनजी पुन्हा पाच रुपयांनी महागला

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी 62.20 रुपये प्रतिकिलो झाले
CNG Price Updates
CNG Price UpdatesEsakal

पुणे : स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात आजपासून पुन्हा पाच रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 68 वरून 73 रुपये झाला आहे. आयात करण्यात येत असलेल्या गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत पाच एप्रिल रोजी सीएनजी सहा रुपयांनी महागला होता. आता पुन्हा पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात सीएनजी 11 रुपयांनी महागला आहे. सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी केल्याने एक एप्रिल रोजी दर प्रतिकिलो 6.30 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे काही दिवस पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी 62.20 रुपये प्रतिकिलो झाले होते. (CNG Price Updates)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरून तीन टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी केली होती. एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी होणार होती. त्यानुसार व्हॅट कमी झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र आता ते दोन टप्प्यात दरवाढ होत 73 रुपये किलो झाले आहे.

गेले काही दिवसांपासून स्थानिक गॅसची कमतरता आहे. तर आयात गॅस महाग दुपटीहून अधिक किमतीने महाग झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सीएनजीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती स्थिर झाल्या तर पुण्यात देखील किमती स्थिर राहू शकतात. मात्र अंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही स्थिरता नाही. त्यामुळे येत्या काळात सीएनजीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण एका ठराविक पातळीनंतर दर स्थिर होतील.

दीपक सावंत, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com