पुण्यात वाहतूक विभागाची दहा वर्षाची कागदपत्रे जळून खाक

संदीप जगदाळे
सोमवार, 10 एप्रिल 2017

हडपसरः पुणे शहर वाहतूक विभागाच्या गोडावूनला रविवारी (9) रात्री लागलेल्या आगीत गेल्या दहा वर्षातील दंड पावत्यांची कागदपत्रे जळून खाक झाली. वर्षभरात या गोडावूनला तिस-यांदा आग लागली, मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या कै. अण्णासाहेब मगर रूग्णालयातील काही भाग या गोडावूनसाठी दिलेला आहे. धुराचे मोठे लोट पसरल्याने रूग्ण आणि परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

हडपसर आग्नीशामक केंद्राचे प्रमुख शिवाजी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे कारण समजले नाही. मात्र, वर्षभरात या गोडावूनला तिस-यांदा आग लागली आहे. मगर रूग्णालयाच्या सुरक्षारक्षकाने रविवारी रात्री आग लागल्याची माहिती दिली. आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. कोंढवा व हडपसर केंद्राच्या आठ गाडयांच्या सहाय्याने सकाळी पाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले. कागदपत्रांमधून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पून्हा धुर येवू लागल्याने आम्ही प्रयत्न केले. वाहतूक विभागाचा एकही कर्मचारी याठिकाणी नव्हता. वांरवार या गोडावूनला आग लागत असल्याने त्रस्त नागरिकांनी व रूग्णांनी वाहतूक विभागाचे हे गोडावून बंद करण्याची मागणी केली आहे.

याबाबत नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या, महापालिकेच्या दवाखान्याची ही इमारत आहे. या जागेचा वापर रूग्णांच्या सोयीसाठीच झाला पाहिजे. मात्र, या ठिकाणी वाहतूक विभाग तसेच गुन्हे युनिट पाच यांची कार्यालये आहेत. गेली अनेक वर्ष जप्त केलेली वाहने याठिकाणी लावली आहेत. त्यामुळे रूग्णांना त्रास होतो. लवकरच या जागेचा ताबा पून्हा महापालिका घेईल. याठिकाणी अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी अद्यावत रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे.