पुणे महापालिकेच्या 'जावईबापूं'ची बदली

ज्ञानेश सावंत
सोमवार, 8 मे 2017

पुणे: महापालिकेचे 'जावईबापू' समजले जाणारे अर्थात, महापालिकेचे अतिरक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची अखेर महापालिकेतून बदली झाली. विशेष म्हणजे, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पावणेदोन वर्षांनी म्हणजे, पाच वर्षांनी बदली झाली.

जगताप यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला असून, ते आता मूळ खात्यात म्हणजे, लष्कराच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागात रूजू होण्याची शक्‍यता आहे. परंतु, त्याबाबबत कोणताही आदेश नसल्याने जगताप यांच्याबद्दल महापालिकेसह शहरात चर्चा आहे.

महापलिकेचे कर्तव्यदक्ष तत्कलीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूवी बदल्यानंतर जगातप यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्‍न स्वयंसेवी संस्थांनी विचारला होता. जगताप हे राज्यातील एका माजी मंत्र्याचे "जावई' असल्यानेच त्यांची बदली केली जात नसल्याचा या संस्थांचा आरोप होता. त्यामुळे चर्चेत आले होते. तसेच, रस्ते खोदाई, रस्ते खोदाई करणाऱ्या एका खासगी कंपनीला कोटयवधीचा दंड, शिक्षण मंडळाचा कारभार आणि शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रमुख शुभांगी चव्हाण यांच्या निलंबनाच्या निर्णयामुळेही जगताप यांच्या चर्चा होती.

राज्य सरकारने अखेर जगताप यांच्या बदलीचा आदेश काढला असून त्यांच्या जागी रायगडच्या जिल्हाधिकारी शितल उगले यांची नेमणूक करण्यात आली.

Web Title: pune municipal: rajendra jagtap transfer