आधार नोंदणीचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे - गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले आधार नोंदणीचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 172 मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या ही नोंदणी महा ई-सेवा केंद्रात सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

केंद्र सरकारने आयकर भरण्यासाठी आधार व पॅन कार्ड नोंदणी आवश्‍यक केली आहे. या शिवाय अन्य सुविधांसाठीदेखील आधार कार्ड बंधनकारक केले आहे; परंतु आधार नोंदणी कंपन्यांशी केलेल्या कराराची मुदत संपल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून राज्यात आधार नोंदणी व दुरुस्तीचे कामे जवळपास बंद झाली होती. त्यातून अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच काही नागरिकांना आयकर भरण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे आधार नोंदणी कधी सुरू होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

यासंदर्भात जिल्हाधिकारी राव म्हणाले,""आधार नोंदणी करण्यास बुधवारपासून सुरवात झाली आहे. त्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 172 मशिन उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे 470 मशिन होत्या. मशिनची अपुरी संख्या असल्यामुळे महा ई-सेवा केंद्र, महापालिका आणि जिल्हा परिषदांना नोंदणीसाठी हे मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणखी मशिनची मागणी सरकारकडे करली आहे. त्या उपलब्ध झाल्यानंतर अन्य ठिकाणीदेखील ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.''