माझ्या ताईला वाचवा होऽऽ...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

वारजे माळवाडी (पुणे) : राखी पौर्णिमा अवघ्या दहा दिवसांवर आलेली असताना... "किती ही पैसे लागू द्या, तिच्या उपचारासाठी लागणारा खर्च करण्यासाठी मी काही पण काम करतो. पण माझ्या ताईला वाचवा', अशी काळीज पिळवटून टाकणारी आर्जव विक्रांत चव्हाण करीत होता.

वारजे माळवाडी (पुणे) : राखी पौर्णिमा अवघ्या दहा दिवसांवर आलेली असताना... "किती ही पैसे लागू द्या, तिच्या उपचारासाठी लागणारा खर्च करण्यासाठी मी काही पण काम करतो. पण माझ्या ताईला वाचवा', अशी काळीज पिळवटून टाकणारी आर्जव विक्रांत चव्हाण करीत होता.

बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करणाऱ्या विक्रांतला त्याच्या बहिणीचा चांदणी चौकात अपघात झाल्याचा फोन सकाळी आला. तो तसाच थेट चांदणी चौकात पोचला. तोपर्यंत त्याच्या बहिणीला घटनास्थळावरून उचलून ससूनला नेले होते. तेथील लोकांनी दिलेली घटनेची माहिती ऐकून तो तेथेच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने शेजारील दवाखान्यात दाखल केले. अपघातात त्याची बहीण पूजा जागीच ठार झाली आहे. ही माहिती त्याला दिली नव्हती. शुद्धीवर आल्यावर त्याला ससूनमध्ये नेले.

"कितीही पैसे लागू द्या, तिच्या उपचारासाठी लागणारा खर्च करण्यासाठी मी काही पण काम करतो. पण माझ्या ताईला वाचवा.' असे म्हणत तो पुन्हा बेशुद्ध झाला. तेथे त्यास रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला. नातेवाईक व मित्रांनी त्याला बहिणीच्या मृत्यूची बातमी दिली. त्यानंतर त्याला भावना अनावर झाल्या. धाय मोकलून रडताना तो म्हणत होता, "आता मला राखी कोण बांधणार?'... या त्याच्या प्रश्‍नाला कोणाकडेच उत्तर नव्हते!

विक्रांतच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. वडील मोलमजुरी करतात. ते मुळचे हैदराबादचे. चाळीस वर्षांपूर्वी ते वारजे येथे आले. पूजाचे शिक्षण हैदराबाद येथेच झाले. ती आयटी पार्कमधील कॉलसेंटरमध्ये तेलगू भाषेत कामाला होती. तर जखमी शीतल राजू राठोड ही तिची मामी त्याच कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेत कामाला होत्या. दोघीही वारजे माळवाडीतील विठ्ठलनगर परिसरात राहण्यास होत्या. दोघींची घरे समोरासमोर आहेत. त्यामुळे दोघी कामाला एकत्र ये-जा करीत होत्या. पूजा रोज सकाळी वडील, भाऊ व स्वत:चा स्वयंपाक करून कामाला जात होती. आता त्यांच्या घरात वडील आणि भाऊ असा परिवार आहे. दोन्ही घरात रुग्णालयात धावपळ करण्यास कोणीच नातेवाईक नसल्याने सकाळीच नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयात होते.

राठोड पती- पत्नी अपंग
शीतल राठोड (वय 30) यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले असून, अपघातात त्यांचा डावा पाय निकामी झाला आहे. दुर्दैव असे की, शीतल यांचे पती राजू यांचा गेल्या वर्षी धायरी येथे झालेल्या अपघातात उजवा पाय निकामी झाला आहे. ते स्टाईल फरशी बसविण्याचे काम करीत होते. या दांपत्याला दोन मुले असून, मोठा दुसरीला, तर लहान बालवाडीमध्ये शिक्षण घेत आहे. या अपघातात शीतल यांनादेखील पाय गमवावा लागल्याने पती-पत्नी दोघेही अपंग झाले. अशी बिकट परिस्थिती राठोड कुटुंबावर आली आहे.

संबंधित बातमीः

Web Title: pune news accident in chandani chauk and pooja chavan