पुणे: पीएमपीची 4 वाहनांना धडक; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

अप्पर इंदिरा नगर परिसरात हा तीव्र उतार असून, याठिकाणी यापूर्वीही अपघात झालेले आहेत. अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

पुणे - अप्पर इंदिरानगरच्या उतारावर पीएमपीएमएल बसचा ब्रेक निकामी झाल्याने पाच वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी पीएमपी बस उतारावरून येत असताना ब्रेक निकामी झाला. त्यामुळे बसने आणखी एका बससह टेम्पो, आणि दोन दुचाकींना धडक दिली. टेम्पो आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. तर, दुचाकी बसखाली अडकल्या गेल्या. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अप्पर इंदिरा नगर परिसरात हा तीव्र उतार असून, याठिकाणी यापूर्वीही अपघात झालेले आहेत. अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Web Title: Pune news accident in Uppar Indiranagar 2 dead