कलाकारांची उपस्थिती, गप्पा आणि मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पुणे - ‘सकाळ’च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’तर्फे नुकत्याच झालेल्या ‘समर यूथ समिट २०१७’ मध्ये विविध कलाकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्न उत्तराच्या गप्पाही चांगल्याच रंगल्या. या ‘समिट’मध्ये विविध दिग्गजांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याशिवाय ‘इंटरॅक्‍शन विथ लीजंट’ या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.

पुणे - ‘सकाळ’च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’तर्फे नुकत्याच झालेल्या ‘समर यूथ समिट २०१७’ मध्ये विविध कलाकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्न उत्तराच्या गप्पाही चांगल्याच रंगल्या. या ‘समिट’मध्ये विविध दिग्गजांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याशिवाय ‘इंटरॅक्‍शन विथ लीजंट’ या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. यात विदुला घोडके, सदाशिव पंडित, मंगेश तेंडुलकर, भारती भराटे, चंदू बोर्डे, अभिजित कटके, चारुहास पंडित, सदाशिव पंडित, सुचेता भिडे-चाफेकर, सुधीर गाडगीळ, शैलेश वाडेकर, विवेक खटावकर, डॉ. अशोक नगरकर व चकोर गांधी यांनी सहभाग घेतला. 

अभिनय विकसित होण्यासाठी नाटकातले काम खूप महत्त्वाचे ठरते.नाटकातले काम हे जिवंत असल्याने त्याचा फायदा हा पुढील कुठल्याही अभिनय क्षेत्रात उपयोगी पडतो.
- ललित प्रभाकर, अभिनेता 

मी एक मराठी मुलगी आहे. मला असे वाटते अभिनयाला भाषा ही फक्त अभिनयाची असते. भाषा कुठलीही असो, ती अभिनयाची अडचण ठरत नाही.
- नेहा महाजन, अभिनेत्री

‘यिन’मुळे मला आज बऱ्याच तरुणाईचे कौशल बघायला मिळाले. त्याच्या प्रश्नांना उत्तरे देताना मज्जा आली. ‘यिन’चे व्यासपीठ तरुणाईला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे.
- श्रेयस जाधव, चित्रपट निर्माता

‘यिन’मुळे मला आज येथे संधी मिळाली. तरुणांचे प्रश्न जाणून घेऊन मी त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला. डिजिटल मीडिया व त्याची उत्सुकता तरुणांमध्ये दिसली.
- सुजय खांडगे, डिजिटल मार्केटिंग एक्‍स्पर्ट 

महात्मा गांधी यांच्या टोपीचे महत्त्व आजही मुंबईच्या डब्बेवाल्यांमुळे जपून आहे. वेळेचे नियोजन, अचूकता व टीम वर्क या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रिन्स चार्ल्स यांनी सुद्धा आमचे काम बघण्यासाठी रस्त्यावर भेट घेतली होती. आमचे काम यशस्वीपणे अविरतपणे सुरू आहे.
- रघुनाथ मेडगे, अध्यक्ष,  मुंबई टिफिन बॉक्‍स सप्लायर अससोसिशन

सध्याचे युवक हे भारताचा भविष्यातील चेहरा आहे. या प्रेरणेतून ‘यिन’मार्फत राबविला जाणाऱ्या उन्हाळी अधिवेशनामध्ये युवकांना केंद्रस्थानी धरून अनेक उपक्रमांची माहिती, त्यासाठी लागणारे सहकार्य आणि मार्गदर्शन केले गेले. हा उपक्रम स्तुत्य आहे.
- कुणाल कड, व्यवस्थापकीय संचालक, युगांत फूड्‌स अँड बेव्हरेज प्रा. लि.

आज मी अमिताभ बच्चन यांचा अभिनय केला, त्यात तरुणाई भारावली. त्यांच्यासोबत मी अमिताभ यांचे काही संवादही शेअर केले. तरुणाईची उत्सुकता बघून मला खूप आनंद झाला.
- शशिकांत पेडवल, कलाकार