कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शताब्दी सांगता वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पद्मभूषण शरदचंद्र पवार कृषी प्रदर्शन’ भरविण्यात आले होते. त्याला शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी आणि पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतीमध्ये ठिबक सिंचनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील जलवाहिन्या, कीटकनाशके यंत्रे, कुक्कुटपालन, खते, अवजारे, छोटे ट्रॅक्‍टर, बी-बियाणे, मळणी, खुरपणी यंत्रे अशा विविध यंत्रांच्या विक्री व प्रदर्शन मांडण्यात आले होते. तब्बल शंभर स्टॉल उभारण्यात आले होते. वातानुकूलित तंबूमध्ये स्टॉल्स उभारण्यात आले होते. कमी दिवसांमध्ये मोठ्या होणाऱ्या कोंबडीच्या पिलांच्या स्टॉलला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ‘मोबाईल बॅंकिंग व्हॅन’ हे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, देशी व विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधी, ग्रामीण भागातून आलेले प्रयोगशील शेतकरी, महिला आणि कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. दोन दिवस झालेल्या या प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिल्याची माहिती आयोजकांनी या वेळी दिली.