कृषीचे तंत्रज्ञान पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे - पंढरपुरी अन्‌ मुऱ्हा जातीच्या म्हशी... साहिवाल अन्‌ राठी जातीच्या गाई... संगमनेरी अन्‌ उस्मानाबादी शेळी, अशा विविध जातींचे पाळीव प्राणी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना ‘कृषी तंज्ञत्रान महोत्सव २०१७’ मध्ये मिळाली. 

पुणे - पंढरपुरी अन्‌ मुऱ्हा जातीच्या म्हशी... साहिवाल अन्‌ राठी जातीच्या गाई... संगमनेरी अन्‌ उस्मानाबादी शेळी, अशा विविध जातींचे पाळीव प्राणी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना ‘कृषी तंज्ञत्रान महोत्सव २०१७’ मध्ये मिळाली. 

राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात पाळीव प्राण्यांसह शेतीतील नवे-नवे संशोधन आणि शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कृषी सिंचन प्रणालीपासून ते यंत्र, अवजारांपर्यंत शेतीशी निगडित असलेले तंत्रज्ञान राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जाणून घेता येत आहे. तसेच कृषी विषयक व्याख्याने आणि प्रात्यक्षिकही आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा या प्रदर्शनाला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते बुधवारपर्यंत (ता.१३) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत खुले राहील.  

विविध प्रकारच्या भाज्या असो वा पीक घेण्याच्या पद्धती, याविषयी शेतकऱ्यात प्रदर्शनात माहिती मिळत आहे. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया तसेच नगदी पिके, यामधील विविध २८ पिकांचे ७४ वाण, २० भाजीपाला पिकांचे ३९ वाण, १२ फुलपिकांचे ४६ वाण आणि १३ फळपिंकांचे २४ वाण यांची सविस्तर माहिती प्रदर्शनात देण्यात येत आहे. गाईंच्या ९ जाती, म्हशींच्या २ जाती, शेळ्यांच्या ७ भारतीय आणि २ विदेशी जाती, मेंढीच्या ३ भारतीय जाती यासह कोंबड्या, बदके आणि कुक्कटपालनातील पक्षीही येथे पाहता येत आहेत. 

जैविक खते, कीड नियंत्रण पावडर इत्यादीबाबतही माहिती देण्यात येत आहे. मळणी यंत्र, पेरणी यंत्र, औषध फवारणी यंत्र यांच्यासह शहरी भागातील परसबाग इत्यादींचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची संधीही येथे मिळेल.