विमानतळावर ‘पिकअप पॉइंट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - लोहगाव विमानतळावर प्रवाशांना घेऊन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. यातून मार्ग काढण्यासाठी विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एका ‘पिकअप पॉइंट’ची व्यवस्था करण्याचा निर्णय विमानतळ विकास प्राधिकरणाने घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

विमानतळ येथील पार्किंगचे शुल्क कमी केल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे यांनी यूार्वी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र प्राधिकरणाने शिरोळे यांच्या निर्णयाला हरताळ फासला होता व पूर्वीप्रमाणेच पार्किंग शुल्क आकारणी करण्यात येत होती. त्याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये येताच शिरोळे यांनी ‘पिकअप पाइंट’ची सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे पत्रक काढून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विमानतळावरील प्रवाशांच्या ‘पिकअप’साठी येणाऱ्या वाहनांना ही सुविधा वापरता येणार असून, अर्ध्या तासासाठी ३० व एका तासासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती शिरोळे यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

विमानतळाच्या हद्दीपासून तीस मीटर अंतरावर सध्या असलेल्या पार्किंग क्रमांक दोनजवळ हा ‘पिकअप पॉइंट’ तयार करण्यात येणार आहे. प्रवाशांना या पॉइंटपर्यंत जाण्यासाठी विशेष सुविधा (वाक वे) उपलब्ध केली जाणार आहे. या नवीन व्यवस्थेमुळे प्रस्थानासाठी (डिपारचर)  येणाऱ्या वाहनांना थेट टर्मिनलपर्यंत विनासायास येता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: pune news airport