पुणे: आयटी पार्कमध्ये बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू, 35 जखमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

आयटी पार्कच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात अनेक देशी विदेशी कंपन्या व गृह प्रकल्पांची काम जोमात सुरू आहेत. त्यासाठी परराज्यातून आलेला कामगार वर्ग बाधकाम चालू असलेल्या ठिकाणी  तात्पुरत्या निवाऱ्यात राहतो. फेज थ्री मधेही एल अँड डब्लू कंपनीच्या प्रकल्पाच्या  इमारतीच सुरू असलेल्या जागेतही अशाचप्रकारे काही कामगार वास्तव्याला होते. याठिकाणी कामगारांना राहण्यासाठी एक लोखंडी स्लॅब आणि पत्र्यांच्या सहाय्याने तात्पुरती दुमजली इमारती  बनवण्यात आल्या आहेत. 

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्यात मान भोईर वाडीच्या हद्दीत रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सुमारे 35 ते 40  जण जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

आयटी पार्कच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात अनेक देशी विदेशी कंपन्या व गृह प्रकल्पांची काम जोमात सुरू आहेत. त्यासाठी परराज्यातून आलेला कामगार वर्ग बाधकाम चालू असलेल्या ठिकाणी  तात्पुरत्या निवाऱ्यात राहतो. फेज थ्री मधेही एल अँड डब्लू कंपनीच्या प्रकल्पाच्या  इमारतीच सुरू असलेल्या जागेतही अशाचप्रकारे काही कामगार वास्तव्याला होते. याठिकाणी कामगारांना राहण्यासाठी एक लोखंडी स्लॅब आणि पत्र्यांच्या सहाय्याने तात्पुरती दुमजली इमारती  बनवण्यात आल्या आहेत. 

प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री काही कामगारांमध्ये भांडण झाल्याने सुमारे  ५० ते ६० कामगार या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत जमले होते. एकाचवेळी अधिक वजनामुळे बाल्कनीवर लोड आल्याने ही बाल्कनी कोसळली.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल.एन. डब्लू लेबर कॅम्प हिंजवडी, फेज ३ येथे एक तात्पुरत्या पत्र्याच्या इमारतीमध्ये तब्बल सातशे ते आठशे कामगार राहतात. काल रात्री दहा वाजता छताची लोखंडी बाल्कनी कोसळून अजब लाल या कामगाराचा मृत्यू झाला. याशिवाय, दुर्घटनेत ३५ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ज्या कंत्राटदाराने तात्पुरत्या स्वरूपाचे लोखंडी छत उभारले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्याचे काम आज सकाळी 10 वाजे पर्यंत सुरू होते.