देशातील सर्व समस्यांचे मूळ आर्थिक विषमता - डॉ. भालचंद्र मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - ""आर्थिक विषमता हे देशातील इतर सर्व समस्यांचे मूळ आहे. आर्थिक विषमता संपुष्टात आणण्यासाठी प्रस्थापितांनी आणि आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्यांनीच आता पुढाकार घेण्याची गरज आहे. "आहे रे' गटाने "नाही रे' गटासाठी स्वयंप्रेरणेतून हे केले नाही, तर येत्या काळात सामाजिक-राजकीय अस्थिरता येण्यास वेळ लागणार नाही,'' अशा शब्दांत अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी भाष्य केले. 

नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त मुणगेकर यांना रविवारी "स्कॉलर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्राचार्या डॉ. गिरिजा शंकर, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते. 

मुणगेकर म्हणाले, ""देश स्वतंत्र झाल्यावर आणि संविधान स्थापनेनंतर राजकीय समता अस्तित्वात येण्यासाठी बऱ्यापैकी यश मिळाले आहे. मात्र, सामाजिक आणि आर्थिक समतेचे काय? लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल, तर सर्व बाबतीत समता असणे गरजेचे आहे. मुळात विषमतेला खतपाणी घालणारी मनोवृत्ती बदलायला हवी आणि त्यासाठी आसपासचे वातावरण बदलायला हवे.'' 

या वेळी गाडे म्हणाले, ""फक्त डिग्री नको, तर शिक्षणातून कौशल्य विकसित व्हायला हवे. बदलत्या जगातील आव्हाने पेलायला शिक्षणपद्धतींत बदल हवा. हा बदल घडवण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे.''