गुरूचे नाव सांगून कलाकार घडत नाही - पं. भवानी शंकर

गुरूचे नाव सांगून कलाकार घडत नाही - पं. भवानी शंकर

पुणे - ‘‘केवळ गुरूचे नाव सांगून ‘मी त्यांचा शिष्य आहे’, असे सांगितले जाते. अशाने कलाकार घडत नाही. गुरूची कला आत्मसात करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कला सादर करणारे शिष्य सध्या खूपच कमी आहेत. कला खरोखरच शिकायची असेल, तर गुरू सांगतात त्या पद्धतीने ती शिकली गेली पाहिजे. असे झाले तरच आपली संस्कृती आणि त्या कलेचा प्रसार होईल,’’ असे मत पखवाजवादक पं. भवानी शंकर यांनी व्यक्त केले.

हेरिटेज, द आर्ट लेगसी संगीत ॲकॅडमीच्या वतीने ‘शास्त्रीय संगीत आणि बॉलिवूडचा प्रवास’ या विषयावर पं. शंकर यांच्याशी संवाद आयोजिण्यात आला होता. मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यानिमित्ताने शास्त्रीय संगीतातील पखवाजचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि आजपर्यंतचा बॉलिवूडमधील पखवाजचा प्रवास उलगडत गेला.

पं. शंकर म्हणाले, ‘‘कोणतीही कला शिकणे म्हणजे अथांग सागरात मोती शोधण्याच्या आशेने चाचपडणेच होय; मात्र हे करत असताना तुमच्यातला संयम, ती कला शिकण्याची आस्था, साधना आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे सर्वांत महत्त्वाचे असतात. कला शिकणे हे भक्ती करण्यासमानच आहे.’’ 
पं. शंकर यांनी पखवाजच्या ठेक्‍यावर सादर केलेल्या रावणस्तुती आणि हनुमानचालीसेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘बॉलिवूड’मधील काही गाणीदेखील पखवाज आणि तबल्यावर सादर केली. या वेळी संतोष पोतदार, दीपक मानकर उपस्थित होते.

वाद्य शिकताना त्या वाद्याची ताकद, त्याचा इतिहास समजून घ्यायला हवा. संगीताची स्वत:ची एक भाषा असते, ती संवादाची भाषा बनवत आपल्या वाद्यातून ती इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक कलाकाराने केला पाहिले.
- पं. भवानी शंकर, पखवाजवादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com