बोस्नियाचे सौंदर्य अनुभवा 

बोस्नियाचे सौंदर्य अनुभवा 

पुणे - बोस्निया आणि हर्झेगोव्हिना टुरिझम डेव्हलपमेंन्टतर्फे बोस्नियाचे सौंदर्य चित्रित केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. 

याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाचे राजदूत डॉ. सबित सुबासिक आणि बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाचे कॉन्सुल जनरल सुहास मंत्री उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार (ता. 19) पर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. यात असणारी छायाचित्रे बोस्निया आणि हर्झेगोव्हिना पर्यटनाचे (भारत) अध्यक्ष प्रकाश बंग यांनी टिपली आहेत. युरोपमधील परवडणारे ठिकाण अशी बोस्नियाची ओळख आहे आणि येथे भारतीय पर्यटकांना पाहण्यासाठी पर्यटनस्थळे, नद्या, ऐतिहासिक इमारती आहेत. या प्रदर्शनात बंग यांनी बोस्नियाच्या सौंदर्यांसह स्मारके, युनेस्कोच्या साईट्‌स, तेथील लोक आणि संस्कृतीचे चित्रही टिपले आहेत. 

डॉ. सुबासिक म्हणाले, ""बोस्नियामध्ये नैसर्गिक सौंदर्य, गरम पाण्याचे झरे असल्यामुळे पारंपरिक भारतीय औषध पद्धती विशेषत: वेलनेस सेंटर येथे स्थापन करण्यासाठी उत्सुक आहोत. त्यामुळे युरोप व इतर खंडातून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा फायदा होईल. अक्षय ऊर्जा व हायड्रो पॉवर या क्षेत्रातही सहयोगासाठी क्षमता असून भारतीय कंपन्या बोस्नियामध्ये गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर भारतीय आयटी विद्यापीठ बोस्नियामध्ये स्थापित करायचे आहे. विविध क्षेत्रात परस्पर संबंध अधिक दृढ होणे महत्त्वाचे असून, त्यासाठी लोकांनी बोस्नियाला येऊन तेथील निसर्गाचा अनुभव घ्यायला हवा.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com