"बीएसएनएल'च्या खंडित सेवेमुळे सहदुय्यम निबंधक कार्यालय बंद ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - "भारत दूरसंचार निगम लिमिटेड'च्या (बीएसएनएल) खंडित सेवेमुळे कर्वे रस्त्यावरील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज गेल्या तीन दिवसांपासून पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनदेखील कुठलीच हालचाल झालेली नाही. 

""कर्वे रस्ता येथील काकडे सिटी येथे बीएसएनएलने स्वतंत्र "फायबर ऑप्टिक केबल' टाकून त्यावरून स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि उपनिबंधक कार्यालयाला दूरध्वनी जोडणी दिलेली आहे. परंतु, त्यासाठीचे काम खासगी संस्थेला दिले. त्या संस्थेने विजेचे बिल न भरल्याने बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. या संदर्भात बीएसएनएलच्या मुख्य कार्यालय, संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार अर्ज देऊनदेखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जमीन व सदनिकांच्या खरेदी विक्रीच्या नोंदणीसाठी सुट्ट्या काढून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे दूरवरून आलेल्या नागरिकांसह स्थानिक व्यावसायिकांनादेखील त्याचा फटका बसला आहे,'' अशी माहिती स्थानिक व्यावसायिक शेखर खेडेकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या संदर्भात "बीएसएनएल'च्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, "काम सुरू आहे, येत्या काही दिवसांमध्ये समस्या सोडवली जाईल,' असे आश्‍वासन दिले. 

टॅग्स