चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे 27 ऑगस्टला भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - चांदणी चौकातील बहुचर्चित तीन मजली उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे - चांदणी चौकातील बहुचर्चित तीन मजली उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

या चौकात उड्डाण पूल झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होण्याची अपेक्षा आहे. या कामासाठी महापालिका अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) खर्च करणार, या बाबत वाद निर्माण झाला होता. त्या वेळी गडकरी यांनी पुलाचा सुमारे 419 कोटी रुपयांचा खर्च "एनएचआयए' करेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्याच हस्ते पुलाच्या कामाचे भूमिपूजन करणार आहे, असे या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. त्या प्रसंगी बारामती, मुळशी तसेच जिल्ह्यातील अन्य रस्त्यांशी संबंधित "एनएचआयए'च्याही कामांचे भूमिपूजनही गडकरी यांच्या हस्ते होईल. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह महापौर मुक्ता टिळक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: pune news chandani chowk overbridge bhumi pujan