पुणे विभागातील 95 टक्के गावांमध्ये चावडी वाचन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - राज्य सरकारच्या "ई फेरफार' उपक्रमाअंतर्गत सर्व गावांमधील सातबारा ऑनलाइन करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारामधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी गावांमध्ये "जाहीर चावडी वाचन' मोहीमदेखील सुरू आहे. त्यामध्ये पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 95 टक्के गावांमधील ई फेरफार, सातबारा संगणकीकरणासह चावडी वाचन पूर्ण झाल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. 

दळवी म्हणाले,"" चावडीवाचन मोहिमेतून हस्तलिखित सातबारांमधील चुका दुरुस्ती करून संगणकीकृत सातबारांमध्ये नोंदी केल्या जात आहेत. त्यावर तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार स्तरावर "री - एडिट' सुविधेद्वारे संगणकीकृत सातबाराच्या चुका पूर्ण केल्या जात आहेत. राज्यातील संबंधित महसूल यंत्रणेला सातबाराचा सर्व्हे क्रमांक योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत "सातबारा व आठ अ' साठी तब्बल 24 मुद्यांच्या आधारे सातबारांच्या त्रुटींची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 31 ऑगस्टपर्यंत शंभर टक्के चावडीवाचनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल.'' 

पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात 58 तालुके आहेत; तर एकूण सहा हजार 727 गावे आहेत. त्यातील 6 हजार 29 गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील सातबारांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तिथे विलंब होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला शंभर गावांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये 250 गावांमध्ये चावडीवाचन झाले आहे; परंतु सोमवारपर्यंत (ता.14) प्रत्येक जिल्ह्यात 50 गावांतील सातबारा संगणकीकृत झाले आहेत. 
चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त 

Web Title: pune news Chandrakant Dalvi