इंधनावरील करकपातीसाठी निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘अन्याय्य इंधन दरवाढ रद्द करावी, एक देश, एक कर यामध्ये पेट्रोल-डिझेलचा समावेश करावा, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्याच पाहिजेत’ आदी विविध मागण्यांसाठी जनसंघर्ष समितीने रविवारी निदर्शने केली. 

समितीतर्फे टिळक चौकात काळे झेंडे दाखवत झालेल्या निदर्शनात विकास देशपांडे, गोपाळ तिवारी, ॲड. रवींद्र रणसिंग, विठ्ठल सातव, सिंधु काटे, राणी परांडे, सविता ठाकूर आदींनी भाग घेतला. 

या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड म्हणाले, ‘‘दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महागाईचे चटके बसत असताना लोकांच्या भावना राज्य सरकार लक्षात घेत नाही. पेट्रोल-डिझेलचे वाढवलेले दर कमी करून सरकारने लोकांना दिलासा द्यावा.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र माळवदकर म्हणाले, ‘‘आताचे सरकार सामान्य माणसाला फसवत आहे. शेतकरी कर्जाचे कारण सांगून दुष्काळ टॅक्‍स घेत आहे; मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही.’’